रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

*Temporary Migration बाबत*

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *19/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

         *Temporary Migration बाबत*

Temporary Migration काय हे सर्वप्रथम समजावून घेऊ.
*Temporaary Migration म्हणजे पालकांच्या रोजगारामुळे विद्यार्थ्याचे झालेले तात्पुरते स्थलांतर होय.*पालकांच्या व्यवसायामुळे अथवा इतर काही कारणास्तव विदयार्थ्यांना त्यांच्या समवेत जावे लागते.असे स्थलांतर तात्पुरते अथवा हंगामी असते.काही ठरावीक महिन्यानंतर असे विध्यार्थी आपल्या पालकासमवेत पुन्हा मूळ गावी परततात.यामुळे अशा मुलांना शिक्षण घेण्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून शासन स्तरावरून देखील काळजी घेतली जाते.अशा विद्यार्थ्यांना ते ज्या ठिकाणी पालकांच्या व्यवसायानिमित्त जातील अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या शाळामध्ये अशा मुलांना शिकण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली असते.अशा ठिकाणच्या शाळेची या मुलांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्याची आणि इतर मुलांप्रमाणे यांनादेखील दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आहे,हे आपणास माहिती आहेच.
 अशा प्रकारे ज्या शाळेत मुले तात्पुरते दाखल होतील अशा शाळा मुलांना दाखला किंवा इतर कागदपत्रे न मागता सुलभ रीतीने शिक्षण उपलब्ध करून देतात.वर्षानुवर्षे अशी प्रक्रिया राज्यात सुरु आहे.परंतु आजपर्यंत किती मुले अशा प्रकारे migrate झाले आहेत याविषयी आकडेवारी मिळताना अडचण प्राप्त होत होती किंवा ही आकडेवारी शासनास उशिरा उपलब्ध होत होती.यामुळे शासनास सदर मुलांसाठी नियोजन करणे ही बाब तशी अडचणीची होती.परंतु आता ही बाब सरल मुळे सोपी होणार आहे.कारण आता तात्पुरत्या स्वरूपात migrate झालेल्या प्रत्येक मुलाची नोंद सरल मधून घेणार आहोत.तशी सुविधा आजपासून student पोर्टल ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.या सुविधेचा वापर करून कशा प्रकारे अशा तात्पुरत्या स्थलांतर झालेल्या मुलांची नोंद सरल मध्ये घ्यावी याविषयी आपणास सविस्तर माहिती या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे.

*सर्वप्रथम मुख्याध्यापकाने आपले student पोर्टल ला लॉगिन करावे.*
                            ⬇
*यानंतर transfer या टॅब मध्ये temporary migration नावाची एक टॅब आपणास दिसून येईल.या टॅब ला क्लीक करावे.*
                           ⬇
*यानंतर आपणास एक फॉर्म ओपन झालेला दिसून येईल.यामध्ये आपण विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी.*
                           ⬇
*ज्या विद्यार्थ्यास आपणास temporary migrate करावयाचे आहे त्या विद्यार्थ्याचा student id भरावा किंवा सदर विद्यार्थी हा कोणत्या वर्गात आहे तो वर्ग आणि तुकडी भरावी.*
                           ⬇
*यानंतर खाली दिलेल्या to be migrate आणि already migrate असे दोन option दिसतील.*
       
*To be migrate* : ज्यांना आपण आता migrate करणार आहोत असे विद्यार्थी.

*Already migrated* : सदर शाळेने migrate केलेले आहे असे विद्यार्थी.
                               ⬇
*त्या इयत्तेच्या तुकडीतील To be migrate असे सिलेक्ट केल्यावर त्या प्रकारातील सर्व मुलांची यादी दिसून येईल.त्या लिस्ट मधील ज्या विद्यार्थ्याचे तात्पुरते स्थलांतर करावयाचे  आहे त्या विद्यार्थ्यास सिलेक्ट करून घ्यावे.*
                               ⬇
*या विद्यार्थ्यास सिलेक्ट केल्यावर त्यापुढे उपलब्ध असलेल्या option मध्ये त्याच्या पालकांचा अथवा ठेकेदाराचा मोबाईल क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे त्याशिवाय सदर माहिती सिस्टिम कडून स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.*

यानंतर शेवटच्या रकान्यात सदर विद्यार्थी कोणत्या कारणास्तव तात्पुरता स्थलांतर झालेला आहे त्याचे कारण दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करणे गरजेचे आहे.या कारणामध्ये पुढील कारणे देण्यात आलेले आहे.
अ) *ऊसतोड कामगारांचे स्थलांतर*
ब) *वीट भट्टी कामगारांचे स्थलांतर*
क) *इमारत बांधकाम कामगारांचे    स्थलांतर*
ड) *खाण कामगारांचे स्थलांतर*
इ) *इतर*

या वेगवेगळ्या कारणांपैकी उचित कारण निवडणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी.
                              ⬇
त्या विद्यार्थ्याची अशा प्रकारे सर्व माहिती भरावी.यानंतर खाली उपलब्ध असलेल्या बटनांचा विचार करू.यामध्ये विधार्थी कोणत्या *जिल्ह्यात,तालुक्यात,क्लस्टर आणि शाळेत* तात्पुरता MIGRATE झालेला आहे त्याप्रमाणे DROPDOWN मधील पर्याय निवडून घ्यावे.या मध्ये विद्यार्थी किमान कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात गेलेला आहे याविषयी माहिती असणे आणि भरणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी. *जिल्हा आणि तालुका याविषयी मुख्याध्यापकास माहिती असणे  आवश्यक असून ते भरणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.त्याशिवाय सदर माहिती भरून पूर्ण करणे शक्य होणार नाही.*
                               ⬇
हे option निवडल्यावर जेंव्हा आपण सर्वात शेवटी असलेला migrate या बटनावर क्लीक करू त्यानंतर सदर विध्यार्थी ज्या जिल्ह्याच्या तालुक्यात तात्पुरता migrate झालेला आहे या विषयीच्या माहितीचा त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी तसेच तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना एका रिपोर्ट system द्वारे  उपलब्ध करून दिला जाईल याची नोंद घ्यावी.या माहितीच्या आधारे विध्यार्थी ज्या शाळेत तात्पुरता migrate झालेला आहे त्या शाळेत अशा विद्यार्थ्यास *गटशिक्षणाधिकारी* तात्पुरता attatch म्हणजेच temporary attatch करून घेणार आहे याची नोंद घ्यावी. *आपल्या तालुक्यात किती व कोणते विद्यार्थी इतर ठिकाणाहून तात्पुरते migrate झालेले आहे याविषयीची यादी ही मुख्याध्यापक लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे याची नोंद घ्यावी.सदर यादी पाहण्यासाठी Transfer या टॅब मध्ये Temporary attatch या बॅटनाला क्लीक करा.यानंतर जो फॉर्म उपलब्ध होईल त्यामध्ये आपल्या तालुक्यात इतर ठिकाणाहून migrate झालेले विद्यार्थी यादी दिसून येईल.* ही यादी पाहून सदर यादीत आपल्या शाळेत आलेला मुलगा यात आहे किंवा नाही हे मुख्याध्यापकाने पहावे आणि सदर विद्यार्थी हा यादीत असेल तर गटशिक्षणाधिकारी यांना कळवून अशा विद्यार्थ्याना आपल्या शाळेत तात्पुरते migrate करून घ्यावे.
                               ⬇
विद्यार्थ्याचे पालक ज्या गावात व्यवसायानिमित्त अथवा रोजगारासाठी तात्पुरते migrate झालेले असेल त्या गावातील शाळांचे *मुख्याध्यापक* अशा मुलांचा शोध घेतील आणि सदर मुलाला शालेय शिक्षणाच्या प्रवाहात त्या मुलाला आणण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याचदा अशा केस मध्ये विद्यार्थ्याचे पालक स्वतः त्या गावातील शाळेत आपल्या पाल्याला शिकण्यासाठी घेऊन येतील त्या वेळी त्या शाळेतील मुख्याध्यापकाने अशा विद्यार्थ्याच्या बाबतील सविस्तर चौकशी करावी आणि सदर विद्यार्थी कोणत्या शाळेतून आपल्या कार्यक्षेत्रात तात्पुरता migrate झालेला आहे याची माहिती मिळवावी आणि सदर विद्यार्थ्याच्या बाबतीत आपल्या गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे.a आपल्या शाळेत temporary migrate होऊन  आलेल्या मुलांस आपल्या शाळेत attatch करून घेण्यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या गटशिक्षणाधिकारी यांना online request पाठवू शकतील अशी सुविधा देखील देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
                              ⬇
यानंतर गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन ला उपलब्ध असलेल्या migrate झालेल्या मुलांच्या रिपोर्ट मध्ये सदर विद्यार्थी नोंद उपलब्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि सदर विद्यार्थी त्या लिस्ट मध्ये उपलब्ध असल्यास सदर विद्यार्थ्यास त्या शाळेत तात्पुरता attatch करून घेतील. temporary attatch केलेले मूल हे भविष्यात जर आपल्याच शाळेत कायम शिकणार असेल तर अशा मुलाला आपण काही कालावधीनंतर आपल्या शाळेत रेग्युलर करून घेऊ शकणार आहात.या विषयी यथावकाश माहिती देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

*महत्वाचे* :  *याठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की कोणत्याही शाळेस अशा मुलाला परस्पर attatch करून घेता येणार नाही तर यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधूनच attatch करावे लागेल.*

✏अशा तात्पुरत्या migrate झालेल्या मुलांचे नाव हे आपल्या शाळेच्या रेग्युलर कॅटलॉग मध्ये न दिसता सदर नोंद ही वेगळ्या प्रकारे ठेवली जाईल.अशा मुलाच्या नोंदीचे  कशा प्रकारे व्यवस्थापन करावे याविषयी आपणास पुढील पोस्ट द्वारे योग्य वेळी मार्गदर्शन केले जाईल याची नोंद घ्यावी.तोपर्यंत आपल्या शाळेतून इतर ठिकाणी तात्पुरते migrate झालेल्या मुलास अशा प्रकारे migrate करण्यात यावे हे लक्षात घ्यावे.
✏अशा प्रकारे तात्पुरता migrate झालेला विद्यार्थी त्या शाळेत अधिकृत रित्या शिक्षण घेऊ शकेल.

✏ *टीप*: ज्या शाळेत तात्पुरता migrate झालेला विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जाईल त्या शाळेने सदर विद्यार्थी हा आपल्या शाळेत तात्पुरता अथवा हंगामी स्वरूपात शिक्षण घेण्यासाठी आला आहे ही बाब लक्षात घ्यावी.त्यामुळे अशा मुलाची ट्रान्सफर request मूळ शाळेस पाठवण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून सदर मुलगा आपल्या शाळेतून परत मूळ शाळेत गेल्यावर तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही.तसेच ज्या शाळेत सदर विद्यार्थी तात्पुरता शिक्षण घेण्यासाठी आलेला आहे त्या शाळेस त्या विद्यार्थ्याच्या मूळ शाळेला ट्रान्सफर request देखील करता येणार नाही याची काळजी सिस्टिम द्वारे घेतली जाणार आहे.तसेच मूळ शाळेने अशा विद्यार्थ्यास कोनत्याही परिस्थिती ट्रान्सफर करू नये.अशा प्रकारे चुकीचे ट्रान्सफर झाले आणि आपल्या कॅटलॉग मधून सदर विद्यार्थी गेला तर यासाठी संबंधित जबाबदार असतील याची नोंद घ्यावी अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ स्तरावरून या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

*अत्यंत महत्वाची बाब* :
1) *तात्पुरता migrate झालेला विद्यार्थी ज्या जिल्ह्यात,तालुक्यात,शाळेत गेलेला आहे त्या विषयी अशा मुलांच्या बाबतीत नोंद घेऊन सदर विद्यार्थी शाळांनी migrate करण्याची सध्या सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.*

2) *ज्या शाळेत विद्यार्थी migrate झालेला आहे त्या शाळेने गटशिक्षणाधिकारी यांना online request करणे आणि गटशिक्षणाधिकारी यांनी सदर विद्यार्थ्याना त्या शाळेस attatch करणे ही सुविधा यथावकाश देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*
------------------------------------------------------
*आवाहन* : *मित्रांनो,शेवटी एक बाब महत्वाची आहे की ,कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित राहता कामा नये हेच आपण करत असलेल्या सेवेचे अंतिम उद्दिष्ट आहे.ते उद्दिष्ट साध्य करणे हे आपल्यासारख्या शिक्षकाच्या दृष्टीने एक प्रकारे देशसेवेचे काम आहे याची जाणीव माझ्या प्रत्येक शिक्षक बांधवास आहे यात दुमत नाही. याअगोदर पासून वर्षानुवर्षे offline पद्धतीने हे काम आपण करत आलेलो आहोत परंतु शासकीय स्तरावर याची अधिकृत रित्या माहिती प्राप्त व्हावी आणि या विद्यार्थ्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य वेळेत उपाय योजना आखण्यासाठी मदत मिळावी हा उद्देश ही माहिती भरण्यामागे आहे.मित्रांनो,चला तर मग आपल्या इतर कामासोबत हे काम देखील पूर्ण करून एक प्रकारे देशसेवा करूया आणि देशाच्या या भावी पिढीस अधिक दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्न करूया.*
-------------------------------------------------------
✏ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा