माझी शाळा.

जि.प.प्राथ.शाळा तिड्या ,ता.रावेर ,जि. जळगाव 

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील चौथ्या रांगेत असलेल्या, पूर्णपणे आदिवासी वस्ती असलेल्या तिड्या या गावातील जि.प.शाळा. हे गाव यावल तालुक्याच्या सीमेवर असून फक्त प्रशासकीयदृष्ट्या रावेर तालुक्यात आहे, बाकी पूर्णपणे संपर्क यावल तालुक्याशी आहे. फैजपूर शहरापासून २० कि.मी. असलेल्या या गावाला जाण्यासाठी धड रस्ता नव्हता. वर्षाच्या आठ महिने यावल आगाराची बस यायची परंतु पावसाळ्याचे ४ महिने बस बंद असायची, २००९ साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अर्धा रस्ता केला, बाकीचा अजूनही कच्चाच आहे. मोर नदीच्या काठावर वसलेले असे हे तिड्या गाव. गाव तसे लहानसेच इनमीन १०० घरे असलेले गावची लोकसंख्या ६८९ गावातील ९५% लोक तडवी समाजाचे तर ५% पावरा समाजाचे. दोन्ही समाजाच्या बोलीभाषा वेगवेगळ्या, परंतु तडवी समाज मुस्लीम धर्माचे पालन करत असल्याने त्यांच्यावर हिंदी आणि उर्दू भाषेचाच प्रभाव अधिक, आणि शिक्षण मराठीतून.
     २००६ साली इ.१ली ते ४थी चे एकूण ३५ विद्यार्थी पटावर व दोन शिक्षक कार्यरत होते. वर्गात जेमतेम ५ ते ७ मुले-मुली हजर राहत असत. ते ही १५ ऑगस्ट नंतर शाळेकडे पाठ फिरवीत. घरातील बोलीभाषा तडवी आणि पावरी माझी बोलीभाषा अजून वेगळी पण शिक्षण मराठीतून, पालक अशिक्षित, दारिद्र त्यांच्या पाचवीला पुजलेली, त्यात भर म्हणून कि काय विविध वाईट सवयी. अशा अनेक अडचणींवर उपाययोजना करत, २०१४-१५ साली आमच्या शाळेची पटसंख्या ७१ वर पोहचली, चालू शैक्षणिक वर्षात ३ शिक्षक कार्यरत असून पटसंख्या ७० आहे. 
दर्शनी भाग दि.१९\१०\२०१५

Side view दि.१९\१०\२०१५
माझा स्टाफ डावीकडून श्रींम. बानू तडवी (अंगणवाडी सेविका), श्रींम. रमाबाई माने (शि.से.) , आमचे मुख्या. श्री. नारायण बढे, मी स्वतः श्री. नवनाथ पवार. दि.१५/०८/२०१५
शाळेचा दर्शनी भाग २०१३-१४




दि. २८/१२/२०१५ रोजी जि.प.प्राथ.शाळा, तिड्या,ता.रावेर येथून माझी वेतन्नोती होऊन केंद्रीय पूर्ण प्राथमिक शाळा कुंभारखेडे, ता.रावेर, जि.जळगाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक झाली......
परंतु, ही शाळा digital करायची राहून गेली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा