शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

मधमाश्यांमुळे पृथ्वीवर टिकुन आहे सजीव सृष्टी.

मधमाश्यांमुळे पृथ्वीवर टिकुन आहे सजीव सृष्टी.
   सह्याद्रीच्या सौंदर्याची झलक फक्त यांचीच देन.

     एक महिना झाला होता मी वनप्रशिक्षणा निमीत्ताने जालनाला गेलो होतो. जाताना छोटसी गाव, सुंदर झरे नद्यां तलाव झाड निसर्ग संपन्न व नयनरम्य दृश्य न्याहाळत गेलो होतो.महिन्यातील प्रत्येक दिवस शिकण्यात आणी मौजमजेत चालू झाले होते. आमच्या जवळच मेस समोर एक प्रशिक्षणार्थिंनी फुलवलेली छोटीसी भाजीपाला शेती होती.त्या शेतीत एक मधमाशी कुटुंब राहत होते.नेहमी येण्याजाण्याचा मार्ग तेथुन असल्यामुळे येताजाता मी त्यांच्याकडे डोकावून पहायचो. त्यांनी खुपच छान अस घर बनवल होत. घराच्या समोरील फुललेला परीसर त्या घराच्या सौंदर्यत भर घालत  होता.मला त्यांनी बांधलेले घर पहायला खूप आवडत होते.त्या घरातील सर्व सदस्यांनी आपली कामे अगदी जबाबदारीने वाटून घेतली होती.
       अगदी जन्मलेल्या नविन बाळापासून तर वृधांपर्यत सर्व जण त्या कुटुंबातील सदस्य सकाळच्या सुर्य किरणापासून तर संध्याकाळच्या मावळतीच्या किरणापर्यंत काम करताना दिसत होती. जगात एकमेव हा असा किटक आहे की जो जन्माला आल्या पासून मरेपर्यंत झोप न घेता केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबासाठी कष्टच करताना दिसतो. व त्यांनी साठवलेले अन्न धुर्त कोल्हा नाही मनुष्य क्षणाचा विचार न करता. त्यांच्या घराला आग लावून, त्यांना धूर देऊन हिसकावून घेतो.
 आपल्याला का समजत नाही.एका मानसाच आयुष्य एखाद्या ने उध्वस्त केले तर आपण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतो, मोर्चे काढतो. परंतु प्राण्यांच पक्ष्यांच आयुष्य उध्वस्त करताना आम्हाला काहीच वाटत नाही.ते पण सजीवच आहेत् ना? मग आपण अस का वागतो. आज आपण जगतोय ना त्याच मुख्य कारण म्हणजे फक्त आणि फक्त या मधमाश्या आहेत.ते कस आपणास माहीत आहे का?
निश्चितच नाही ना?                      
मधमाशांबाबत - अल्बर्ट आइन्स्टीन आपल्या पुस्तकात लिहीतात की.....
ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल त्या नंतर अवघ्या चार वर्षा नंतर मनुष्य जातीचेच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीचेच अस्तित्वच संपुष्टात येईल .

      मधमाशी या किटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिस स्पर्शा पेक्षा कमी नसतो.तर फल धारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पती पासून मिळत असले तरिही मधमाशा यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधा सारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व धोक्यात आहे. मधासाठी पोळी जाळणे,विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टोवर उभारणे,मधमाश्या विषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे.यासाठी आपण हे करू शकता म्हणण्या ऐवजी हे कराच.
1) मधमाशाचा अधिवास संपू न देणे व त्यांचे संरक्षण करणे.
2) मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन न काढणे
3) विषारी कीटक नाशकांच्या फवारण्या करू नये अथवा अपरिहार्यता असेल तर संध्याकाळी कराव्यात
4) मधमाश्यांचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन मधमाशा पालन करावे
5) जंगलास वनवा लावू नये अथवा लागल्यास तत्काळ विझवावा
6) शेताच्या आजूबाजूची मधमाश्यांची पोळी काढू नये
7) मधमाश्यांच्या अधिवासात मोबाइल टोवर उभारू नये
8) मधमाश्या विषयी जनजागृती करावी
9) मधमाशांनाउपयुक्त सपुष्प वनस्पतींची लागवड करणे. 10) जंगल तोड न करणे.
मधमाशी अतिशय महत्वाचे काम करते. समूहाने कसे जगावे असा आदर्श माणसाला ते शिकवतात. खुप कष्ट करत मधासारखा गोड पदार्थ निर्माण करते. आपण सर्वजन मधमाशी वाचवण्याचा प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करू या ...!
शेतीला असावी मधमाशीपालनाची जोड
पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाश्यांच्या पालनाला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. रोजगारनिर्मितीला वाव असल्याने हा उद्योग पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
फळे, भाजीपाला पिकांच्या परागीकरणात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात २५ ते ३५% एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मधमाशीपालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते.
मधमाशीपालनाचे फायदे
पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे.
🐝अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.
🐝मधासोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.
🐝कमी खर्चात गाव पातळीवर रोजगार मिळवून देणारा हा उद्योग आहे.
🐝मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.
🐝जागा, वीज, वाहन, इमारत अशा भांडवलाच्या गुंतवणुकीची गरज नसते.
⭕मधमाश्यांच्या प्रजाती⭕
- भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)
- युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)
- आग्या माशी (ॲपिस डॉरसेटा)
- लहान माशी (ॲपिस फ्लोरिआ)
या मधमाश्यांपैकी भारतीय माशी आणि युरोपियन माशी पेटीत पाळता येतात.
🌼परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले
🐝भाज्या - कांदा, कोबी, मुळा, शेवगा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.
🐝फळे - डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्राँबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.
🌺 फुले - शेवंती, झेंडू, होलिहोक, ॲस्टर इ.
🌻पिके - मोहरी, सूर्यफूल इ.
मधपेट्या ठेवण्याची वेळ
- फळबागेतील व फळभाज्या पिकातील फुलोरा ५ ते १० टक्के झाल्यानंतर शेतामध्ये पेट्या ठेवाव्यात.
- एक हेक्टर पिकासाठी अंदाजे ३ भारतीय माश्यांच्या किंवा २ युरोपियन माश्यांच्या मधपेट्या ठेवाव्यात.

⭕मधाची काढणी⭕

पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे, त्या भागातील मधमाशांना दूर करावं आणि पोळी फ्रेम्स काढून घ्यावी.
- मधाच्या फ्रेम्स मधयंत्रात घालून फिरवावे.
-स्टेनलेस स्टिलच्या भांड्यातमध साठवावा.
जर एक मधमाशी आपल्या कुटुंबात न राहता आपल्यासाठी अप्रत्यक्षरित्या खूप काही करते मग तिला मारण्याच तीला तिच्याच घरातून काढण्याच तीच घर उध्वस्त करण्याचा कुणालाच हक्क नाहीय. तिलाही भावना व कुटुंब आहे. जर मधमाश्या संपल्या तर आपणहि जगू शकत नाही.
आज आपण save water,save tree,save Tiger.अस म्हणतो उद्यां अशी म्हणण्याची वेळ येवू नये Save Pepole आपण आपली व सर्व प्राण्याची काळजी घ्यायला हवीच. 
टीप- वरील माहितीचा सखल अभ्यास मी स्वतः वनप्रशिक्षण संस्था जालना येथे घेतला असून "वन उपयोगीता" या पुस्तकातील पेज क्रमांक 73 वरील प्राणीजन्य उत्पादने: मध,लाख,रेशीमकिडे या प्रकरणातून घेतलेला आहे.

लेखक - श्री. खरमाळे रमेश  (माजी सैनिक खोडद)
                            वनरक्षक - जुन्नर
                             वनप्रशिक्षणार्थी
                    वनप्रशिक्षण संस्था जालना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा